Rahul Pakhare

RAHHH

श्री. राहुल शिवाजीराव पाखरे​

सिनेट सदस्य : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

संस्थापक / अध्यक्ष : शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट

RAHHH

श्री. राहुल शिवाजीराव पाखरे​

सिनेट सदस्य : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

संस्थापक / अध्यक्ष : शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट

दीपावली शुभेच्छा :

वसुबारस म्हणजेच दीपावलीची सुरुवात आणि घरात पहिला दिवा लावून पूजा केली जाते .
यानिमित्ताने भागातील मित्र व नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात दीपावलीच्या शुभेच्छ्यांचे पत्रक देऊन शुभेच्छा देण्यास सुरुवात केली .

संविधान अमृतमहोत्सव :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ च्या माध्यमातून व राष्ट्रीय सेवा योजना च्या आयोजनातून भारतीय संविधानाची अमृतमहोत्सवी वर्ष निमित्त कार्यशाळा अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या श्री शाहु विद्या मंदिर महाविद्यालयात पार पडली.
यावेळी उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांसोबत संविधान विषयी माझे मत मांडत संवाद साधला याप्रसंगी माझ्यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर , राष्ट्रीय सेवा योजनेच्या शितोळे मॅडम व सर्व मान्यवर उपस्थित होते .

कन्यापूजन व कुटुंबप्रबोधन :

शिवरुद्र प्रतिष्ठान – ट्रस्ट च्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही “ कन्यापूजन व कुटुंबप्रबोधन “ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता , आयोजनाचे हे ५ वे वर्ष असून यावर्षी देखील हा कार्यक्रम उत्साहात पार पडला .
“ सन्मान ती चा – भविष्यातील नारीशक्तीचा “ या उक्तीप्रमाणे आलेल्या सर्व कुमारिकांचे पूजन करून सन्मान करण्यात आला .

अंत्योदय दिन :

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती म्हणजेच अंत्योदय_दिन यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अभिवादन करण्यात आले.
“ एकात्म मानवतावाद व अंत्योदयाचा सिद्धांत “ यावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते एडव्होकेट प्रशांतजी यादव ( संघचालक : कसबा भाग ) व कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू, प्र – कुलगुरू , कुलसचिव, व्यवस्थापण परिषद, अधिसभा सदस्य, अधिष्ठाते, विविध विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

जनसुरक्षा कायदा :

नक्षलविरोधी महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या समर्थनार्थ पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर चौक सभा पार पडली .
संविधान व लोकशाहीविरोधी शहरी नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी जनसुरक्षा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे.
या कायद्याला विरोध करणारे शहरी नक्षलवादी समाजात अपप्रचार करून कायद्याच्या विरोधी वातावरण निर्माण कटण्याचा प्रयत्न करीत आहेत यासाठी ते विविध बुरखे पांघरून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे.
लोकशाहीप्रति निष्ठा असणाऱ्या कोणत्याही घटकाला या कायद्याच्या संदर्भात तक्रार असण्याचे काहीच कारण नाही. ज्या लोकशाहीविरोधी शहरी नक्षल्यांना त्यांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची भीती आहे, त्यांनी कितीही अपप्रचार केला तरी जनता त्यांना कदापि भीक घालणार नाही.
संविधान व लोकशाहीप्रति आस्था असणारा प्रत्येक नागरिक या कायाद्याच्या समर्थनार्थ खंबीरपणे उभा आहे.
यावेळी माजी खासदार अमर जी साबळे, आमदार सुनिलभाऊ कांबळे , विविध संघटना व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .

वारकरी भक्तियोग :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य , राष्ट्रीय सेवा योजना व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने “ वारकरी भक्तियोग “ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुल मध्ये २१ जून रोजी सकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आला होता .
२१ जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवस याचे औचित्य साधत पुण्यातील मुक्कामासाठी आलेले वारकरी आणि पुणेकरांनी एकत्रित योग करून यास एक वेगळी उंची दिली .
याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील तसेच विविध शैक्षणिक , धार्मिक , आध्यात्मिक , राजकीय , सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मंडळीनी सर्व वारकऱ्यांसोबत योगा केला .
यामध्ये जवळपास ३५० हून अधिक ठिकाणी याचे दोनीही बाजूचे प्रक्षेपण करत जवळपास लाखो वारकरी , विद्यार्थी व पुणेकर सामील झाले होते .

तणावमुक्ती व व्यसनमुक्ती वारी :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या आयोजनातून पुणे ते पंढरपूर आषाढी वारीनिमित्त ‘ स्वच्छ वारी – स्वस्थ वारी – निर्मल वारी – हरित वारी ‘ उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय ‘ दिंडी ‘ उपक्रमाचा उद्घाटन समारंभ आज पार पडला.

पेपरलेस छाननी आणि सारणी कक्ष ( S & T ) :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील S & T म्हणजेच छाननी आणि सारणी कक्षाचे पेपरलेस होण्याच्या दृष्टीने चालू असलेलेया प्रयत्नाला काल मूर्तस्वरूप प्राप्त झाले व आता हा विभागही पूर्णपणे पेपरलेस झाला आहे .
परीक्षा विभाग पेपरलेस करण्याच्या सिनेट मधील प्रस्तावाची पूर्तता होते आहे याचे समाधान आहे .
याप्रसंगी माझ्यासोबत उद्घाटक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी सर व विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ पराग काळकर , प्रभारी परीक्षा संचालक डॉ प्रभाकर देसाई व सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते .
इथून पुढे आता कोणत्याही महाविद्यालयातील शिक्षकांना स्वतः विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन विद्यापीठात येऊन दाखल करण्याची गरज पडणार नाही जर त्यांच्या काही समस्या असतील तर त्यांना खालील लिंकवर जाऊन समस्या जमा करता येणार आहेत .
त्याचप्रमाणे आता डुप्लिकेट डिग्री सर्टिफिकेट , डुप्लिकेट मार्कशीट, ट्रान्सक्रिप्ट , सप्लिमेंटरी डिग्री सर्टिफिकेट, मायग्रेशन, कंसर्न सर्टिफिकेट, रैंक व मीडियम प्रमाणपत्र साठी सर्व ऑनलाईन स्वरूपात प्रक्रिया करून “ घरबसल्या “ हे सर्व प्रमाणपत्र मिळणार आहे , हे अगोदरच झाले आहे परंतु आता त्यातील उरलेल्याही सर्व गोष्टी आता ऑनलाईन स्वरूपात झाल्या आहेत आता कागदपत्रे घेऊन विद्यापीठात येण्याची आवश्यकता नाही पुन्हा एकदा आठवण करून देत आहे त्यासाठी लिंक खालीप्रमाणे ;
आपले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आता कशातच मागे राहणार नाही आपणही आता गगन भरारीकडे मार्गक्रमण करत आहोत .

हिंदू साम्राज्य दिन :

हिंदू साम्राज्य दिन उत्सव समिती आयोजित श्री शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे हिंदू साम्राज्य दिन पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात सुपर भागात साजरा करण्यात आला .
हा उत्सव साजरा करण्याचे हे ९ वे वर्ष आहे , यानिमित्ताने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्यात उपस्थित होतो .

विद्यापीठ विकास मंच :

विद्यापीठ कायदा २०१६ सुधारणा करताना विद्यार्थी केंद्रित सकारात्मक बदलाला विद्यापीठ विकास मंचाचा पाठिंबा तर राजकीय हस्तक्षेपाला तीव्र विरोध ! ! !
महाराष्ट्र शासनाने विद्यापीठ कायदा २०१६ मध्ये सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या डॉ. नितीन करमळकर समितीला भेटूननिवेदन दिले असून विद्यापीठ विकास मंचने विद्यार्थी केंद्रित सकारात्मक बदलाला पाठिंबा दिला असून विद्यापीठाची स्वायत्तता व राजकीय हस्तक्षेपाला तीव्र विरोध केला आहे .
– काळानुरूप विद्यापीठ कायद्यामध्ये आवश्यक बदल करताना विद्यार्थी केंद्रित सकारात्मक बदल करण्यात यावेत.
– कुलगुरू नियुक्ती व विद्यापीठाच्या अधिकारी भरतीमध्ये प्रभारी राज संपुष्टात आणावे व कालावधी समाप्त होण्यापूर्वीच प्रक्रिया पूर्ण करावी.
– विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुका या विलंबाने होत असून आधीचा प्राधिकरण कालावधी संपण्यापूर्वी सहा महिने अगोदर ही प्रक्रिया सुरू करण्यात यावी व वेळेत प्राधिकरण गठीत करावे .
– महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद ( स्टुडन्ट कौन्सिल ) निवडणूक या तत्काळ सुरू कराव्यात .
– अभ्यास मंडळात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना निमंत्रितच्या ऐवजी स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त करावे .
– विद्यापीठाच्या सर्व उपक्रमामध्ये स्पोर्ट,एनएसएस, युवा महोत्सव प्रत्येक महाविद्यालयाचा सहभाग बंधनकारक करावा .
– आधिसभा व व्यवस्थापन परिषद बैठकीत विद्यार्थी केंद्रित विषयाला चर्चेसाठी राखीव वेळ ठेवावा .
– अधिसभा बैठका वर्षात तीन वेळा घ्याव्यात किंवा दिवस वाढवावा
– सर्व विद्यापीठ परीक्षांच्या निकालाचे वेळापत्रक वर्षाच्या सुरवातीला घोषित करून त्याप्रमाणे वेळेत अंमलबजावणी करावी .
यासह अनेक मुद्द्यांचा समावेश असलेले निवेदन आज या समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर (माजी कुलगुरू पुणे विद्यापीठ )यांना देण्यात आले याप्रसंगी विद्यापीठ विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष प्रा. एन डी पाटील,मंचाचे प्रदेश सचिव परमेश्वर हासबे, अभाविप चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ. प्रशांत साठे व मंचाचे प्रदेश कार्यालय प्रमुख सिनेट सदस्य राहुल पाखरे उपस्थित होते .

पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती :

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व बहिशाल शिक्षण मंडळ च्या वतीने निरंतर चालणाऱ्या व्याख्यानमालेमध्ये “ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमाला “ चा समावेश करण्यात आला आहे .
या व्याख्यानमालेच्या लोगो चे आज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेशजी गोसावी सरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले , याप्रसंगी प्र- कुलगुरू डॉ परागजी काळकर , संचालक हरीशजी नवले , माझे सिनेटचे सहकारी प्रसेनजितदादा फडणवीस , शंतनु लामदाडे व कृष्णा बंदलकर उपस्थित होते .
या व्याख्यानमालेच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महिलाविषयक असणाऱ्या विविध गुणांचे महात्म व त्यांच्या विचारांचा खरा जागर या व्याख्यानमालेच्या माध्यमातून होणार आहे असा विश्वास आहे .
सिनेट च्या माध्यमातून मांडलेल्या माझ्या प्रस्तावाच्या पूर्तिनिमित्ताने मनाला समाधान वाटते आहे .
सर्व सिनेट सदस्य , व्यवस्थापन परिषद सदस्यांचा मी मनापासून आभारी आहे .

अटल महाआरोग्य तपासणी शिबिर :​

भारताचे माजी पंतप्रधान , भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या शताब्दी जयंती महोत्सवनिमित्त व शिवरुद्र प्रतिष्ठान – ट्रस्ट च्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त “ अटल महाआरोग्य तपासणी शिबिर “ २५ व २६ जानेवारी सुखसागर नगर येथे आयोजित करण्यात आले होते .
या आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर , रक्तातील कोलेस्टेरॉल , रक्तातील २४ घटकांची तपासणी , डोळे तपासणी मोतीबिंदू , काचबिंदु , निसर्गोपचार वैद्यांचा सल्ला व थेरपी , अस्थी तज्ञ , हृदयतज्ञ , मधुमेह तज्ज्ञ , छातीचा एक्स रे , छातीचा कर्करोग , मोफत गोळ्या औषधे , मोफत चष्मे अशा एकूण १३ तपासण्या साधारणतः ९५०० रुपयांचे असणारे चेकअप मोफत करण्यात आल्या .
आरोग्याबाबत जागृती व्हावी , पूर्वतपासन्या केल्याने आपल्या शारीरिक नियंत्रणाचा सहजपने अंदाज येतो आणि त्यानुसार पुढील गोष्टी योग्य रीतीने अवलंबता येतात , जेणेकरून पुढे चालून अधिक वैद्यकीय समस्येचा त्रास कमी होऊ शकतो हीच एक अपेक्षा शिबिराच्या आयोजन करण्यामागे होती .
यामध्ये ११३० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत आरोग्यसेवेचा लाभ घेतला यातील मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी योग्य असणाऱ्या सर्वांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडणार आहोत .
शिबिराचे उद्घाटन खडकवासला मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते झाले , या शिबिरास विधानपरिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर , नगरसेवक रघुनाथ गौडा , बाळा ओसवाल , दिनेश धाडवे , सामाजिक कार्यकर्ते गोकुळ काका शिंदे , प्राजक्ता ताई जाधव , मंगेश रासकर , विनोद सुद्रिक , निलेश गुरव , विकास भोसले , रितेश शेडगे, नितीन ढमाले , सागर सोळंकी , श्रीकांत गायकवाड , अजय भोकरे , दीपक पालवे , अनिल मेमाणे , रमेश मोहिते , अजिंक्य थोरात , बळीराम निंबाळकर , निलेश कुलकर्णी , विजय दर्दिगे , आनंद साळुंके, श्रीकांत पवार , निलेश बोराडे यांनी शिबिरास भेट देत रिपोर्ट व चष्मे वाटप केले .
शिबिर यशस्वी करण्यामध्ये भारती आयुर्वेद हॉस्पिटल , समर्थ युवा फाउंडेशन , एच व्ही देसाई आय हॉस्पिटल , ओसवाल पॉलिक्लिनिक व निसर्गोपचार हॉस्पिटल येवलेवाडी यांनी विशेष सहकार्य केले .
शिबिर आयोजन करण्यामध्ये शिवरुद्र प्रतिष्ठान – ट्रस्ट च्या सर्व सहकाऱ्यांचा पाठिंबा होता त्यामुळेच हा आरोग्य सेवेचा उपक्रम यशस्वीपने पार पडला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज करून मिळणार आहे :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजी व माजी विद्यार्थ्यास परीक्षेबाबत ची गुणपत्रिका , डुप्लिकेट प्रमाणपत्र , परदेशातील उच्च शिक्षणास लागणारे ट्रांसक्रिप्ट प्रमाणपत्र , पुढील शिक्षणासाठी लागणारे मायग्रेशन प्रमाणपत्र व पदविका प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज करून मिळणार आहे .
अर्ज केल्यानंतर ऑफलाईन कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता आता राहणार नाही .
अर्ज ऑनलाइन जमा करण्यानंतर ची सर्व प्रक्रिया मेसेज व मेल च्या द्वारे समजत राहणार जर कोणाची काही तांत्रिक अडचण असेल तर त्या अडचणीचा मेसेज व मेल आपणास प्राप्त होईन त्यानुसार ती अडचण दूर करण्यासाठी आपणास लिंक ही पाठवली जाईन जेणेकरून आपल्या नेमक्या समस्येची माहिती पुन्हा आपणास अपलोड करावयास येणार आहे .
आपण अर्ज केलेले व आपणास लागणारे प्रमाणपत्र हे पोस्टाने ही घरी मागवता येणार आहे त्याचा ट्रॅकिंग नंबर ही मॅसेजद्वारे आपणास कळवण्यात येणार आहे जेणेकरून आपणास ते समजेन .

स्टूडेंट पोर्टल ची लिंक खालीलप्रमाणे :
https://sim.unipune.ac.in/sim_app/Login/Login

सद्याच्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अद्ययावत असणारी परीक्षा विभागातील प्रमाणपत्रांची “ पेपरलेस “ सुविधा विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरणार आहे .
यातून कमीत कमी ५० कोटी रुपयांची विद्यार्थ्यांची उलाढाल थांबणार आहे .
प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यापीठात येण्यासाठी लागणारे गाडीभाडे , जर काम नाही पूर्ण झाले तर निवासाचा खर्च असे पकडून सांगितलेली कमीत कमी ५० कोटी रुपये वाचणार आहे .

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेचा समावेश :

राम जन्मभूमी निधी संकलन व अक्षदा वाटप अभियान :

आपल्या हिंदू धर्मातील आस्थेचा विषय असणारा राम मंदिर विषय खरंतर मोदीजी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रत्येक हिंदूंच्या मनातला राम मंदिर चा विषय ज्वलंत झाला आणि याच राम मंदिराचे स्थापना करण्यासाठी सर्व समाजातून निधी संकलित करण्यात आला होता या संकटांच्या निमित्ताने मी माझ्या श्री राम राज्य वस्ती मधून निधी संकलित केला या निधी संकलनाच्या माध्यमातून आमचाही खारीचा वाटा राम मंदिराच्या निर्माण मध्ये झाला याचा आनंद आहे.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी राष्ट्रीय सण सादरीकरण :

शिवरुद्र प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गेल्या बारा वर्षांपासून राष्ट्रीय उत्सव म्हणजेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारी चे आयोजन करण्यात येते त्याचप्रमाणे गणेशोत्सव शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व नवरात्र उत्सवानिमित्त दांडी यांच्या आयोजन करण्यात येतो

कलम ३७० रद्द केल्याबद्दल आनंदोत्सव व अभिनंदन :

एक देश मे दो निशान, दो विधान और दो प्रधान नही चलेगा असे म्हणत खऱ्या अर्थाने शामाप्रसाद मुखर्जींनी आपले बलिदान दिले होते परंतु मोदी सरकार आल्यानंतर ३७० कलम हटवण्याचा निर्णय पारित झाला या झालेल्या निर्णयानिमित्ताने शिवरुद्र प्रतिष्ठानच्या वतीने अंबामाता मंदिर चौक सुखसागर नगर येथे जल्लोष व मोठा आनंदोत्सव साखर वाटप करून करण्यात आला.
जहा हुए बलिदान शिपाई वो कश्मीर हमारा है, जिस कश्मीर ने खून सिंचा वो कश्मीर हमारा है ! ! ! आशा घोषणा देत आनंदोत्सव करण्यात आला.

बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा सत्कार :

खरंतर बिबवेवाडी भाग हा गुन्हेगारीने ग्रासलेला परंतु या ग्रासलेल्या चिखलामध्ये कमळरुपी काम करण्याचे यश शिवरुद्र प्रतिष्ठानच्या पदरी पडले बिबवेवाडी भागातील “ पहिला आदर्श गणेशोत्सवाचा पुरस्कार “ शिवरुद्र प्रतिष्ठानला मिळाल्या कारणाने सर्व गणेश मंडळांनी व पोलीस स्टेशन मधील पीआय कोपनर साहेबांनी आम्हा सर्वांचा सत्कार केला

डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये संविधानविरोधी बोलणाऱ्यांविरोधात एफ आय आर दाखल :

भारतामध्ये पवित्र असणाऱ्या राज्यघटनेच्या रुपी संविधानावर टीकास्पद बोलणे केल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी डेक्कन पोलीस स्टेशन येथे एफ आय आर दाखल केली 

फर्ग्युसन महाविद्यालयातील राडा :

पुणे शहरातील फर्ग्युसन महाविद्यालयात देश विरोधी घोषणा देणाऱ्या कारवाई करावी याचे पत्र दिले होते या पत्राच्या अनुषंगाने विचारपूस करण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो होतो खरं तर या देशांमध्ये भारत मातेच्या नावाने गदारोळ करणाऱ्यांना माफी मिळणार नाही अशी आमची मागणी होती परंतु तिथे येऊन आव्हाड यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी गदारोळ निर्माण झाला होता या विरोधात प्रचंड तणावा निर्माण करून दबाव दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु आम्ही तो हाणून पाडला.

माओवादी हल्ल्याचा निषेध :

महाराष्ट्रातील दुर्गम असणाऱ्या गडचिरोली भागामध्ये खऱ्या अर्थाने नक्षलवाद्यांचे जाळे आहे यामध्ये लोकशाहीच्या मूल्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो त्यातील एक प्रकार म्हणजे नक्षलवाद तिथे महाराष्ट्र दिनी माओवाद्यांनी स्पोर्ट घडून आणला होता यास पोटामध्ये आपले १६ जवान हुतात्मा झाले याच्या निषेधार्थ आदरणीय प्रदीप दादाराव यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला

एम आय टी महाविद्यालयातील आंदोलनात सहभाग :

एम आय टी महाविद्यालयात दलित विद्यार्थीला फी न भरल्या कारणाने हिनवन्याचे काम चालू होते या अनुषंगाने “ बहन के सन्मान में शिवरुद्र प्रतिष्ठान मैदान मे ! ! ! 

कोरोना काळामध्ये वस्तीमध्ये लसीकरण :

कोरोना काळामध्ये जग एका जागी स्तब्ध झाले माणुसकीला काळीमा फासणारा तो क्षण आपण सर्वांनी अनुभवला परंतु यामध्ये आपल्या सर्वांना मार्गक्रमण करण्यासाठी लस उपलब्ध झाली आणि या लसीबाबतचा मोठा लसीकरणाचा अभियानाचा टप्पा आम्ही पार करू शकलो सुमारे पाच ठिकाणी या लसीकरणाचा शिबिराचा आयोजनाचा महत्त्वाचा वाटा आम्ही उचलला

केरळ पूरग्रस्तांना मदत :

२०१८ साली भारतातील केरळ राज्यामध्ये पूर आला होता, या पुराने दयनीय अवस्था केरळ भागात झाली होती. यावेळेस सामाजिक बांधिलकी म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने कपड्याचे संकलन करण्यात आले होते परंतु हे कपडे जनता वसाहतच्या आंबील ओढा भागाची सीमा भिंत फुटल्याकारणाने तेथील नागरिकांना व वनवासी कल्याण आश्रम नाग्या कातकरी मुलांच्या वसतिगृह मध्ये संकलित केलेली कपडे देण्यात आले.

नमो विजय अभियान :

२०१४ साली भारतामध्ये खूप मोठे परिवर्तन झाले त्यातील राजकीय घडामोडी मोठ्या परावर्तित झाल्या ते म्हणजे साठ वर्षांच्या असणाऱ्या काँग्रेस सरकारला पराभूत करून भारतीय जनता पार्टीचे सरकार नरेंद्र मोदींच्या रुपीने स्थापित झाले. यामधील खारीचा वाटा म्हणून नमोविजय अभियान यशस्वीपणे आयोजित करण्यात आले होते सुमारे १००० हून अधिक नागरिकांचे एकत्रीकरण करून पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीच का असावे ? याचा स्नेह मेळावा बिबवेवाडी तील पोलीस चौकीच्या बाजूला असणाऱ्या प्रांगणावर घेतला होता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमी संचलन सोहळा :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना दसरा तथा विजयादशमीच्या दिवशी झाली या निमित्ताने प्रत्येक भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन निघत असते या संचलनामध्ये दरवर्षी सहभाग निश्चित असतो

सत्कार सुनील जी देवधरांचा :

भारतातील एका कोपऱ्यातील असणाऱ्या त्रिपुरा राज्यातील विजयामध्ये मोलाचा वाटा असणारा व विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आदरणीय सुनीलजी देवधर यांचा सत्कार शिवरुद्र प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला

राष्ट्रीय योग दिन :

भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या योगाने चमत्कार घडवला आहे दरवर्षी भारतामध्ये हा योग दिन मोठ्या आनंदात पार पडत असतो यामध्ये सर्व नागरिकांसोबत सहभाग असतो

पानिपत विजयाची अडीचशे वर्षपूर्ती :

पानिपत हा विषय तसा जगभर अभ्यासला जातो अनेक जण म्हणतात की पानिपत मराठी हरले परंतु ते हरले नसून खरा पानिपत नंतरचा मराठ्यांचा एक दिल्लीवरती विजय झाला त्या विजयाची २५० वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने मोठा आनंदोत्सवाचा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला होता. आदरणीय दादा रावत एअर महाराष्ट्र भूषण गोखले त्याचप्रमाणे आपल्या वसुंधरा राजे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत :

२०१५ सालि महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आला होता या दुष्काळामुळे आपले सर्व शेतकरी बांधव दुखावले गेले होते तर काही जणांनी आत्महत्याही केल्या होत्या अशातीलच पिंपळदरी नावाच्या गंगाखेड मधील गावी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. या कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी व त्यांना आर्थिक मदत देऊन कौटुंबिक मदत करावी असा शूरुद्र प्रदेशाचा मानस होता यासाठी दक्षिणापेटी ऐवजी बचत पेटी नाव देऊन सर्व समाजातून गणेशोत्सव मंडळे नवरात्रोत्सव मंडळ काही व्यापारी यांच्याकडून आर्थिक निधी गोळा केला आणि हा निधी दिवाळीच्या दोन दिवस आधी या पीडित कुटुंबांना कर्तव्यरुपी हस्तांतरित केला तब्बल ७३ हजार रुपये या तीन आत्महत्याग्रस्त व चार पीडित कुटुंबांना देण्यात आला.

G-२० :

भारताला मिळालेल्या G-२० समूहाच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने भारतात अनेक ठिकाणी कार्यक्रम पार पडत असताना आपण पाहत आहोत याचाच एक महत्वाचा भाग असणाऱ्या चौथ्या शैक्षणिक समूहाच्या बैठकीचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पार पडले यांच्यामध्ये शिक्षण विषयातील सहभागी झालेल्या सर्व देशांचे शिक्षणमंत्री उपस्थित आहेत यावेळी शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्रासाठी असणारे विषय व सहभागी झालेले देश त्याचप्रमाणे सर्व सचिव उपस्थित होते यावेळी विविध आलेल्या पाहून्यांशी गप्पा व चर्चा करण्याची संधी मिळाली.

WhatsApp Image 2024-12-11 at 7.00.47 PM
WhatsApp Image 2024-12-11 at 7.02.59 PM

राष्ट्रीय युवा दिन :

आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त G-२० शिखर परिषदेसंदर्भात जनजागृतीपर यात्रा पार पडली, हि यात्रा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती स्वामी विवेकानंद यांस सा फु पु विद्यापीठात व राजमाता जिजाऊ यांस लालमहाल येथील पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले, नंतर हि यात्रा लालमहाल पासून शनिवारवाडा येथून विद्यापीठात पोहोचली त्यांनतर सा फु पुणे विद्यापीठात शैलेंद्रजी देवळाणकर यांचे G-२० व आंतरराष्ट्रीय धोरण या विषयाचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते

WhatsApp Image 2024-12-11 at 7.03.35 PM
WhatsApp Image 2024-12-11 at 7.03.35 PM (1)
WhatsApp Image 2024-12-11 at 7.02.59 PM (1)

प्लोगेथोन मॅरेथॉन :

पुणे शहरामध्ये दरवर्षी स्वच्छतेचा जागा केला जातो या निमित्ताने दरवर्षी पुण्यामध्ये लोगेथॉन मॅरेथॉन आयोजित करण्यात येते या आयोजनात दरवर्षी सहभाग असतो

WhatsApp Image 2024-12-31 at 7.39.13 PM (1)
WhatsApp Image 2024-12-31 at 7.39.12 PM (2)
WhatsApp Image 2024-12-31 at 7.39.13 PM (2)

मेरि माटी - मेरा देश :

भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याच्या निमित्ताने देशभर मेरी माटी- मेरा देश हा उपक्रम राबविला गेला यामध्ये देशातील ऐतिहासिक भागातील माती गोळा करून दिल्ली तील कर्तव्य पथावर संकलीत करण्यात आली त्या उपक्रमणिमित्ताने महाविद्यालयांमध्ये जनजागृती करून ही माती संकलित करण्यात आली 

WhatsApp Image 2024-12-30 at 11.14.22 PM (1)
WhatsApp Image 2024-12-30 at 11.14.22 PM
WhatsApp Image 2024-12-30 at 11.14.24 PM
WhatsApp Image 2024-12-30 at 11.14.25 PM
WhatsApp Image 2024-12-30 at 11.14.21 PM
WhatsApp Image 2024-12-30 at 11.14.26 PM
WhatsApp Image 2024-12-30 at 11.14.27 PM

अंगणवाड्यांमध्ये डिजीटल चार्ट वाटप :

शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट सेवा वस्ती मध्ये शैक्षणिक विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे त्या अनुषंगाने अंगणवाडी भागातील बालकांना अधिक साक्षर करण्यासाठी डिजीटल चार्ट द्वारे अंक व शब्दांची ओळख करून देण्यात आली

RAHUL
WhatsApp Image 2024-12-30 at 11.24.16 PM (2)
WhatsApp Image 2024-12-30 at 11.24.16 PM
WhatsApp Image 2024-12-30 at 11.24.16 PM (1)
WhatsApp Image 2024-12-30 at 11.14.21 PM
WhatsApp Image 2024-12-30 at 11.24.15 PM
WhatsApp Image 2024-12-30 at 11.24.17 PM (1)

सदृढ बालक स्पर्धा :

सेवावस्तीतील बालके कुपोषित न राहता अधिक सदृढ राहण्यासाठी प्रोत्साहनपर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते

WhatsApp Image 2024-12-30 at 11.27.00 PM (2)
WhatsApp Image 2024-12-30 at 11.26.55 PM
WhatsApp Image 2024-12-30 at 11.26.56 PM
WhatsApp Image 2024-12-30 at 11.26.57 PM (1)
WhatsApp Image 2024-12-30 at 11.26.59 PM (1)
WhatsApp Image 2024-12-30 at 11.26.57 PM (2)
WhatsApp Image 2024-12-30 at 11.26.57 PM
WhatsApp Image 2024-12-30 at 11.26.58 PM (1)