श्री. राहुल शिवाजीराव पाखरे
सिनेट सदस्य : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
संस्थापक / अध्यक्ष : शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट

सिनेट सदस्य : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
संस्थापक / अध्यक्ष : शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट
सिनेट सदस्य : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
संस्थापक / अध्यक्ष : शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजी व माजी विद्यार्थ्यास परीक्षेबाबत ची गुणपत्रिका , डुप्लिकेट प्रमाणपत्र , परदेशातील उच्च शिक्षणास लागणारे ट्रांसक्रिप्ट प्रमाणपत्र , पुढील शिक्षणासाठी लागणारे मायग्रेशन प्रमाणपत्र व पदविका प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज करून मिळणार आहे .
अर्ज केल्यानंतर ऑफलाईन कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता आता राहणार नाही .
अर्ज ऑनलाइन जमा करण्यानंतर ची सर्व प्रक्रिया मेसेज व मेल च्या द्वारे समजत राहणार जर कोणाची काही तांत्रिक अडचण असेल तर त्या अडचणीचा मेसेज व मेल आपणास प्राप्त होईन त्यानुसार ती अडचण दूर करण्यासाठी आपणास लिंक ही पाठवली जाईन जेणेकरून आपल्या नेमक्या समस्येची माहिती पुन्हा आपणास अपलोड करावयास येणार आहे .
आपण अर्ज केलेले व आपणास लागणारे प्रमाणपत्र हे पोस्टाने ही घरी मागवता येणार आहे त्याचा ट्रॅकिंग नंबर ही मॅसेजद्वारे आपणास कळवण्यात येणार आहे जेणेकरून आपणास ते समजेन .
स्टूडेंट पोर्टल ची लिंक खालीलप्रमाणे :
https://sim.unipune.ac.in/sim_app/Login/Login
सद्याच्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अद्ययावत असणारी परीक्षा विभागातील प्रमाणपत्रांची “ पेपरलेस “ सुविधा विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरणार आहे .
यातून कमीत कमी ५० कोटी रुपयांची विद्यार्थ्यांची उलाढाल थांबणार आहे .
प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यापीठात येण्यासाठी लागणारे गाडीभाडे , जर काम नाही पूर्ण झाले तर निवासाचा खर्च असे पकडून सांगितलेली कमीत कमी ५० कोटी रुपये वाचणार आहे .
आपल्या हिंदू धर्मातील आस्थेचा विषय असणारा राम मंदिर विषय खरंतर मोदीजी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रत्येक हिंदूंच्या मनातला राम मंदिर चा विषय ज्वलंत झाला आणि याच राम मंदिराचे स्थापना करण्यासाठी सर्व समाजातून निधी संकलित करण्यात आला होता या संकटांच्या निमित्ताने मी माझ्या श्री राम राज्य वस्ती मधून निधी संकलित केला या निधी संकलनाच्या माध्यमातून आमचाही खारीचा वाटा राम मंदिराच्या निर्माण मध्ये झाला याचा आनंद आहे.
शिवरुद्र प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गेल्या बारा वर्षांपासून राष्ट्रीय उत्सव म्हणजेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारी चे आयोजन करण्यात येते त्याचप्रमाणे गणेशोत्सव शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व नवरात्र उत्सवानिमित्त दांडी यांच्या आयोजन करण्यात येतो
एक देश मे दो निशान, दो विधान और दो प्रधान नही चलेगा असे म्हणत खऱ्या अर्थाने शामाप्रसाद मुखर्जींनी आपले बलिदान दिले होते परंतु मोदी सरकार आल्यानंतर ३७० कलम हटवण्याचा निर्णय पारित झाला या झालेल्या निर्णयानिमित्ताने शिवरुद्र प्रतिष्ठानच्या वतीने अंबामाता मंदिर चौक सुखसागर नगर येथे जल्लोष व मोठा आनंदोत्सव साखर वाटप करून करण्यात आला.
जहा हुए बलिदान शिपाई वो कश्मीर हमारा है, जिस कश्मीर ने खून सिंचा वो कश्मीर हमारा है ! ! ! आशा घोषणा देत आनंदोत्सव करण्यात आला.
खरंतर बिबवेवाडी भाग हा गुन्हेगारीने ग्रासलेला परंतु या ग्रासलेल्या चिखलामध्ये कमळरुपी काम करण्याचे यश शिवरुद्र प्रतिष्ठानच्या पदरी पडले बिबवेवाडी भागातील “ पहिला आदर्श गणेशोत्सवाचा पुरस्कार “ शिवरुद्र प्रतिष्ठानला मिळाल्या कारणाने सर्व गणेश मंडळांनी व पोलीस स्टेशन मधील पीआय कोपनर साहेबांनी आम्हा सर्वांचा सत्कार केला
भारतामध्ये पवित्र असणाऱ्या राज्यघटनेच्या रुपी संविधानावर टीकास्पद बोलणे केल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी डेक्कन पोलीस स्टेशन येथे एफ आय आर दाखल केली
पुणे शहरातील फर्ग्युसन महाविद्यालयात देश विरोधी घोषणा देणाऱ्या कारवाई करावी याचे पत्र दिले होते या पत्राच्या अनुषंगाने विचारपूस करण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो होतो खरं तर या देशांमध्ये भारत मातेच्या नावाने गदारोळ करणाऱ्यांना माफी मिळणार नाही अशी आमची मागणी होती परंतु तिथे येऊन आव्हाड यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी गदारोळ निर्माण झाला होता या विरोधात प्रचंड तणावा निर्माण करून दबाव दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु आम्ही तो हाणून पाडला.
महाराष्ट्रातील दुर्गम असणाऱ्या गडचिरोली भागामध्ये खऱ्या अर्थाने नक्षलवाद्यांचे जाळे आहे यामध्ये लोकशाहीच्या मूल्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो त्यातील एक प्रकार म्हणजे नक्षलवाद तिथे महाराष्ट्र दिनी माओवाद्यांनी स्पोर्ट घडून आणला होता यास पोटामध्ये आपले १६ जवान हुतात्मा झाले याच्या निषेधार्थ आदरणीय प्रदीप दादाराव यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला
एम आय टी महाविद्यालयात दलित विद्यार्थीला फी न भरल्या कारणाने हिनवन्याचे काम चालू होते या अनुषंगाने “ बहन के सन्मान में शिवरुद्र प्रतिष्ठान मैदान मे ! ! !
कोरोना काळामध्ये जग एका जागी स्तब्ध झाले माणुसकीला काळीमा फासणारा तो क्षण आपण सर्वांनी अनुभवला परंतु यामध्ये आपल्या सर्वांना मार्गक्रमण करण्यासाठी लस उपलब्ध झाली आणि या लसीबाबतचा मोठा लसीकरणाचा अभियानाचा टप्पा आम्ही पार करू शकलो सुमारे पाच ठिकाणी या लसीकरणाचा शिबिराचा आयोजनाचा महत्त्वाचा वाटा आम्ही उचलला
२०१८ साली भारतातील केरळ राज्यामध्ये पूर आला होता, या पुराने दयनीय अवस्था केरळ भागात झाली होती. यावेळेस सामाजिक बांधिलकी म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने कपड्याचे संकलन करण्यात आले होते परंतु हे कपडे जनता वसाहतच्या आंबील ओढा भागाची सीमा भिंत फुटल्याकारणाने तेथील नागरिकांना व वनवासी कल्याण आश्रम नाग्या कातकरी मुलांच्या वसतिगृह मध्ये संकलित केलेली कपडे देण्यात आले.
२०१४ साली भारतामध्ये खूप मोठे परिवर्तन झाले त्यातील राजकीय घडामोडी मोठ्या परावर्तित झाल्या ते म्हणजे साठ वर्षांच्या असणाऱ्या काँग्रेस सरकारला पराभूत करून भारतीय जनता पार्टीचे सरकार नरेंद्र मोदींच्या रुपीने स्थापित झाले. यामधील खारीचा वाटा म्हणून नमोविजय अभियान यशस्वीपणे आयोजित करण्यात आले होते सुमारे १००० हून अधिक नागरिकांचे एकत्रीकरण करून पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीच का असावे ? याचा स्नेह मेळावा बिबवेवाडी तील पोलीस चौकीच्या बाजूला असणाऱ्या प्रांगणावर घेतला होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना दसरा तथा विजयादशमीच्या दिवशी झाली या निमित्ताने प्रत्येक भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन निघत असते या संचलनामध्ये दरवर्षी सहभाग निश्चित असतो
भारतातील एका कोपऱ्यातील असणाऱ्या त्रिपुरा राज्यातील विजयामध्ये मोलाचा वाटा असणारा व विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आदरणीय सुनीलजी देवधर यांचा सत्कार शिवरुद्र प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला
भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या योगाने चमत्कार घडवला आहे दरवर्षी भारतामध्ये हा योग दिन मोठ्या आनंदात पार पडत असतो यामध्ये सर्व नागरिकांसोबत सहभाग असतो
पानिपत हा विषय तसा जगभर अभ्यासला जातो अनेक जण म्हणतात की पानिपत मराठी हरले परंतु ते हरले नसून खरा पानिपत नंतरचा मराठ्यांचा एक दिल्लीवरती विजय झाला त्या विजयाची २५० वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने मोठा आनंदोत्सवाचा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला होता. आदरणीय दादा रावत एअर महाराष्ट्र भूषण गोखले त्याचप्रमाणे आपल्या वसुंधरा राजे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला
२०१५ सालि महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आला होता या दुष्काळामुळे आपले सर्व शेतकरी बांधव दुखावले गेले होते तर काही जणांनी आत्महत्याही केल्या होत्या अशातीलच पिंपळदरी नावाच्या गंगाखेड मधील गावी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. या कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी व त्यांना आर्थिक मदत देऊन कौटुंबिक मदत करावी असा शूरुद्र प्रदेशाचा मानस होता यासाठी दक्षिणापेटी ऐवजी बचत पेटी नाव देऊन सर्व समाजातून गणेशोत्सव मंडळे नवरात्रोत्सव मंडळ काही व्यापारी यांच्याकडून आर्थिक निधी गोळा केला आणि हा निधी दिवाळीच्या दोन दिवस आधी या पीडित कुटुंबांना कर्तव्यरुपी हस्तांतरित केला तब्बल ७३ हजार रुपये या तीन आत्महत्याग्रस्त व चार पीडित कुटुंबांना देण्यात आला.
भारताला मिळालेल्या G-२० समूहाच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने भारतात अनेक ठिकाणी कार्यक्रम पार पडत असताना आपण पाहत आहोत याचाच एक महत्वाचा भाग असणाऱ्या चौथ्या शैक्षणिक समूहाच्या बैठकीचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पार पडले यांच्यामध्ये शिक्षण विषयातील सहभागी झालेल्या सर्व देशांचे शिक्षणमंत्री उपस्थित आहेत यावेळी शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्रासाठी असणारे विषय व सहभागी झालेले देश त्याचप्रमाणे सर्व सचिव उपस्थित होते यावेळी विविध आलेल्या पाहून्यांशी गप्पा व चर्चा करण्याची संधी मिळाली.
आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त G-२० शिखर परिषदेसंदर्भात जनजागृतीपर यात्रा पार पडली, हि यात्रा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती स्वामी विवेकानंद यांस सा फु पु विद्यापीठात व राजमाता जिजाऊ यांस लालमहाल येथील पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले, नंतर हि यात्रा लालमहाल पासून शनिवारवाडा येथून विद्यापीठात पोहोचली त्यांनतर सा फु पुणे विद्यापीठात शैलेंद्रजी देवळाणकर यांचे G-२० व आंतरराष्ट्रीय धोरण या विषयाचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते
पुणे शहरामध्ये दरवर्षी स्वच्छतेचा जागा केला जातो या निमित्ताने दरवर्षी पुण्यामध्ये लोगेथॉन मॅरेथॉन आयोजित करण्यात येते या आयोजनात दरवर्षी सहभाग असतो
भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याच्या निमित्ताने देशभर मेरी माटी- मेरा देश हा उपक्रम राबविला गेला यामध्ये देशातील ऐतिहासिक भागातील माती गोळा करून दिल्ली तील कर्तव्य पथावर संकलीत करण्यात आली त्या उपक्रमणिमित्ताने महाविद्यालयांमध्ये जनजागृती करून ही माती संकलित करण्यात आली
शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट सेवा वस्ती मध्ये शैक्षणिक विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे त्या अनुषंगाने अंगणवाडी भागातील बालकांना अधिक साक्षर करण्यासाठी डिजीटल चार्ट द्वारे अंक व शब्दांची ओळख करून देण्यात आली
सेवावस्तीतील बालके कुपोषित न राहता अधिक सदृढ राहण्यासाठी प्रोत्साहनपर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते
Your leadership inspires action and drives positive change. We’d love for you to join the WhatsApp group to share your vision and guide meaningful discussions!