श्री. राहुल शिवाजीराव पाखरे
सिनेट सदस्य : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
संस्थापक / अध्यक्ष : शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट

सिनेट सदस्य : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
संस्थापक / अध्यक्ष : शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट
सिनेट सदस्य : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
संस्थापक / अध्यक्ष : शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट
सशक्त महिला मंच च्या वतीने दरवर्षी दांडिया महोत्सव पार पडत असतो, समाजामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या कुटुंबाचे स्थान उंचीवर नेण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सर्व माता माऊलींना “आदर्श दुर्गा – २०२४“ पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. माझ्या आईस “आदर्श दुर्गा – २०२४“ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, आईचा सन्मान विधानपरिषदेचे आमदार योगेशजी टिळेकर व नगरसेविका रंजनाताई टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
अत्यंत काबाडकष्टातून, पुण्याच्या प्रेमनगर सारख्या झोपडपट्टित असणाऱ्या पालाच्या ( ताडपत्रीच्या ) घरातून संसारास सुरुवात करत स्वकर्तृत्वावर एका उच्चशिक्षित आणि यशस्वी सिनेट सदस्याची माता म्हणजेच निर्मला पाखरे.
संसाराचा गाडा हाकत असताना मुलाना संस्कारमय घडविण्याची जिद्द ठेवणारी महिला अशी खरी ओळख, सोसायटीमध्ये जाऊन धुन्याभांड्याची कामे करत भिशीच्या माध्यमातून घरासाठी आणि शिक्षणासाठी पैसे जमा करून ठेवण्याची आणि त्यातून मुलाना शिक्षित करण्याची चिकाटी आईमध्ये होती, आईचे शिक्षण पाचवी परंतु व्यवहार मात्र सी ए सारखा ठेवत असे, तब्बल १४ घरांची आई धुनीभांड्याची कामे करत असायची.
मोठा मुलगा राहुल राजीव गांधी नगर भागात राहुन MBA – BE ( Printing Technology) शिक्षित आहे, इंजिनिअरिंग मध्ये राज्यात सातवा आला असून आज सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठामध्ये पदवीधरांचे नेतृत्व करतो आहे, सिनेट च्या निवडणुकीत पदवीधरांच्या गटातून तब्बल १३५१२ मतानी विजयी. पुणे पोलिसांकडून आदर्श संस्थेचा व आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त करणारा राहुल पाखरे याची माता. त्याचप्रमाणे दुसरा मुलगा गणेश वाणिज्य शाखेचा पदवीधर असून ड्रायक्लिनिंगचा चा उद्योग करतो आहे.
“ मिळूनी साऱ्या जणी “ या प्रसिद्ध मासिक मध्ये आमच्या कुटुंबाची संघर्षात्मक प्रवासाची माहिती प्रसिद्ध केली .
Your leadership inspires action and drives positive change. We’d love for you to join the WhatsApp group to share your vision and guide meaningful discussions!